प्रतिनिधी/ बेळगाव
उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत तसा पाराही चढू लागला आहे. असे असले तरी गोरगरीब जनतेसाठी सरकारने उद्योग खात्री योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ हजारो कामगार घेताना दिसत आहेत. बेळगाव तालुक्मयात दररोज 5 ते 7 हजार कामगार काम करताना दिसत आहेत. कामगारांचे वेतन लक्षात घेऊन सरकारने आता त्यामध्ये वाढ केली आहे. प्रत्येक कामगाराला 14 रुपये पगार वाढवून देण्यात आला आहे. कामगाराने कामासाठी स्वतःचे साधन आणल्यास अतिरिक्त 10 रुपये देण्यात येत आहेत. त्यामुळे कामगारांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्मयासह जिह्यात मोठय़ा प्रमाणात उद्योग खात्री योजनेंतर्गत अनेक बेरोजगार कामगारांना कामे मिळत आहेत. आतापर्यंत हजारो कामगारांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र, काही ठिकाणी काम देण्यात येत नाही, अशा तक्रारीही करण्यात येत आहेत. सध्या बेळगाव तालुक्मयासह जिह्यात मोठय़ा प्रमाणात कामगारांना उद्योग खात्रीतून रोजगार मिळत आहे. यापूर्वी उद्योग खात्रीतील कामगारांना 275 रुपये पगार होता, आता त्यामध्ये वाढ झाली आहे.
उद्योग खात्रीतून अनेक तलाव, गटारी, नदी, नाले व इतर कामांना गती देण्यात आली आहे. बेळगाव तालुक्मयात तर तलाव आणि छोटेखानी धरणांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. आता ऊन्ह वाढत असल्याने कामगारांना त्रास होऊ नये यासाठी सरकारनेही पगारात वाढ केली आहे. यापूर्वी 275 रुपये पगार देण्यात येत होता. आता त्यामध्ये 14 रुपये वाढविण्यात आल्याने तो पगार 289 इतका झाला आहे. याचबरोबर कामगार कामासाठी लागणारे बुट्टी, कुदळ, फावडा यासह इतर साहित्य घेऊन कामाच्या ठिकाणी जातात. या साहित्याचे भाडे देखील 10 रुपये देण्यात येते. त्यामुळे आता उद्योग खात्रीतील कामगारांना 299 रुपये इतकी रक्कम मिळते. यामुळे कामगारांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.