पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना निवेदन
प्रतिनिधी/मिरज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांसह विशेषकरुन व्यापारी, उद्योजक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर आणि बेळगांव मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवासी ग्रुपने ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. पॅसेंजर गाडय़ा बंद असल्याने प्रवाशांसह उद्योग-व्यवसायिकांचे प्रचंड हाल होत असल्याने शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. मध्य रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर रेल्वे गाडय़ा सोडण्याची तयारी दर्शवली असून, आता शासनाच्या परवानगीची आवश्यकता आहे. कोरोना आणि प्रदिर्घ कालखंडाच्या लॉकडाउढनमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या उद्योग-व्यवसायिकांना उभारी घेण्यासाठी दळणवळणाची सोय म्हणून पॅसेंजर गाडय़ा सुरु करण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleनवरात्रौत्सवास प्रारंभ, भक्तीभावात घरोघरी घटस्थापना
Next Article सायकलिंग करत ३६ तासात पार केले ६०० किलोमीटरचे अंतर








