वेंगुर्ले / वार्ताहर:
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर सोपवलेली सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मी पार पाडताना कोकणातील जनतेला या भागात उद्योग व्यवसाय चालू करून रोजगार देण्याचे काम करेन. असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील जल्लोष यात्रेच्या कार्यक्रमात केले.
केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच यांना आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून वेंगुर्लेत आलेले सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वेंगुर्ले मानसीश्वर गार्डन येथील व्यासपीठावर वेंगुर्ले तालुका भाजपाच्यावतीने भलामोठा पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी ढोल-ताशांच्या गजरात व ‘नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘भारत माता कि जय ‘ त्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध संस्था व संघटनांच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ले तालुक्यातील देवस्थान समिती, मराठा समाज संघटना, ओबीसी समाज संघटना, गाबीत समाज संघटना, मुस्लिम संघटना, कुंभार समाज संघटना, ख्रिश्चन समाज, महाराष्ट्र कँश्यू मँन्युफँक्चरर्स असोसिएशन, वेंगुर्ले तालुका वकील संघटना, रिक्षा युनियन संघटना, गिरणी कामगार युनियन, तालुका सरपंच संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट, उज्वला गॅस लाभार्थी, पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी, सुवर्णकार समाज, आत्मनिर्भर योजने अंतर्गत पत्र विक्रेते प्रतिनिधी, माझा वेंगुर्ला संघटना, खानोली ग्रामपंचायत, युवा मोर्चा वेंगुर्ला, वेंगुर्ले तालुका व्यापारी संघटना, किसान मोर्चा शेतकरी सन्मान लाभार्थी व टॉलर चालक-मालक संघटना अशा 25 संघटनांमार्फत मार्फत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेचे सिंधुदुर्गातील संयोजक प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरात जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, निमंत्रित जिल्हा सदस्य राजू राऊळ, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे प्रदेश संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, माजी आमदार कालीदास कोळंबकर, जि.प. अध्यक्षा संजना सावंत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा सरचिटणीस ॲड. सुषमा प्रभू-खानोलकर, पूनम जाधव तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल, मनीष दळवी, बाळा सावंत, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर , प्रशांत खानोलकर, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जि प सदस्य विष्णुदास कुबल, प्रितेश राऊळ, माजी जि.प. अध्यक्ष अशोक सावंत, माजी जि. प. सदस्य निलेश सामंत, मनिष दळवी, यांचा व्यासपीठावर समावेश होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभाराचे काम जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल यांनी पाहिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









