वार्ताहर / गोकुळ शिरगाव
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणीसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे आज मंगळवार दि. २४ ऑगस्ट २०२१ रोजी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असून ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
आमदार चंद्रकांत जाधव यांचे नेतृत्वाखाली व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडेल यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उद्योगमंत्री. सुभाष देसाई यांची भेट घेतली.महाराष्ट्र. संतोष मंडेला यांनी उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परिपत्रकानुसार विविध पूर्तता कराव्या लागतात. चटई निर्देशांक, बीसीसी, ट्रान्सफर मुदतवाढीसाठी व अनुदान परिपत्रक बाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. तसेच नाशिकला महिला क्लस्टरसाठी भूखंड मिळावा, परिपत्रकात स्पष्टता असावी याबाबत अडचणी मांडल्या. शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष. ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमनआशिष पेडणेकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आदि. उपस्थित होते.
उद्योजक उद्योगधंद्याच्या सोईसाठी भागीदारीमध्ये उद्योग सुरु करतात. पण काही कारणास्तव भागीदारीमध्ये भागीदाराला निवृत्त करावे लागते. सध्याच्या अटीनुसार भागीदार उद्योगामधील पहिल्या भागीदाराला 5 वर्ष निवृत्त करता येत नाही. तरी बांधकाम पूर्णत्व दाखला घेतल्यानंतर भागीदार निवृत्तीत विना अट परवानगी देण्यात यावी जेणेकरुन उद्योगवाढीसाठी चालना मिळेल. अशा पाच अटी या परिपत्रकात लिहून उद्योग मंत्र्यांना देण्यात आल्या.









