बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बारावीची परीक्षा रद्द केली. तर दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यात एसएसएलसी परीक्षा १९ आणि २२ जुलै रोजी झाली. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच शनिवारी ७ ऑगस्ट रोजी लागणार आहे. विद्यार्थ्यांना एसएसएलसी परीक्षेचा निकाल sslc.karnataka.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
दरम्यान, राज्याचे माजी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी एसएसएलसीचा निकाल १० ऑगस्टपर्यंत जाहीर होईल असे सांगितले होते. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी राज्याचे माजी गृहराज्य मंत्री बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
दरम्यान, आज मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीचे ऑफलाईन वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात ला. तसेच राज्यात नाईट कर्फ्यूसह विकेंड कर्फ्यूची अंमलबजावणी होणार आहे. त्याचबरेबर राज्यात एसएसएलसी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.









