ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेता उद्यापासून (1 जानेवारी) राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. गार्ड ऑफ चेंज सोहळाही पुढील निर्णयापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1270 रुग्ण आढळले असून, सर्वाधिक 450 ओमायक्रॉन बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल 320 दिल्लीत, 109 केरळमध्ये तर 97 बाधित गुजरातमध्ये आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक नसला तरीही तो 70 पट अधिक संक्रमणकारक असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकारने निर्बंध वाढवले आहेत.