दहा जणांना अटक : 16 हजार रोख, 10 मोबाईल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग झोपडपट्टी परिसरातील एका मटका अड्डय़ावर छापा टाकून दहा जणांना अटक करण्यात आली. सोमवारी सायंकाळी उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 16,200 रुपये रोख रक्कम, 10 मोबाईल व 3 कॅल्युलेटर जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून सर्व दहा जणांवर कर्नाटक पोलीस कायदा कलम 78(3) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सलीम नूरअहमद बाळेकुंद्री रा. खानापूर, संतोषकुमार तिलकराम राजबर रा. अकबरपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. उद्यमबाग, हिंदुराव सीताराम सावंत रा. पार्वतीनगर-उद्यमबाग, चंद्रशेखर वीरप्पा तोरगल रा. महांतेशनगर, गजानन लक्ष्मण राऊत रा. पिरनवाडी, हुसेन गफूरसाब बेपारी रा. कसाई खड्डा, परशुराम रामू हरिजन रा. कसाई खड्डा, संजू आप्पय्या सुपण्णावर रा. अनगोळ, सुनील सुभाष मानोजी रा. हंगरगा, राजू नारायण उच्चुकर रा. जैतनमाळ अशी अटक करण्यात आलेल्या दहा जणांची नावे आहेत.
गोपी बेपारी व बबलू बेपारी या दोन मटका बुकींवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बहुतेक जण मोलमजुरी करून गुजराण करणारे आहेत. झटपट पैशांच्या नादी लागून मटका खेळण्यासाठी आले असता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुचंडी येथेही एकाला अटक

मुचंडी, ता. बेळगाव येथे मटका घेणाऱया एका युवकाला मारिहाळ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. महेश यल्लाप्पा यल्लारी रा. मुचंडी असे त्याचे नाव असून त्याच्या जवळून 4 हजार 300 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.









