पाव किलो गांजा, दोन मोबाईल, दुचाकी जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथे शनिवारी गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी तिघा जणांवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कामगार, विद्यार्थ्यांना नशेबाज बनविण्यासाठी गांजा, पन्नी विकण्याचे प्रकार वाढले आहेत. उद्यमबाग येथे गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी दोघा जणांना अटक केली.
राहुल सूरज जुवेकर (वय 21) रा. पिरनवाडी, पवन ऊर्फ बंडू प्रवीण पवार (वय 22) रा. कपिलेश्वर रोड अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल पाटील याच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 253 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल संच, एक दुचाकी जप्त केली आहे.









