वैद्यकीय सेवेसाठी गाठावे लागते अशोकनगर, कर्मचाऱयांची संख्या सर्वाधिक असूनही वैद्यकीय सेवेची वाणवा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची औद्योगिक वसाहत अशी असणाऱया उद्यमबाग येथील ईएसआय क्लिनिक कुचकामी ठरत आहे. कर्मचाऱयांची सर्वाधिक संख्या असूनही कोणत्याही उपचारासाठी उद्यमबाग येथील कर्मचाऱयांना अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटल गाठावे लागत आहे. इतके दूर जाणे शक्मय नसल्यास पैसे देवून खासगी दवाखान्यातच उपचार करण्याची वेळ कामगारांवर आली आहे. त्यामुळे उद्यमबाग परिसरात ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी कामगार करीत आहेत.
कामगारांच्या वैद्यकीय सेवेसाठी ईएसआयचे बेम्को क्रॉस नजिक व्हेगा हेल्मेट कारखान्यासमोर क्लिनिक आहे. या क्लिनिकवर केवळ उद्यमबागच नव्हे तर मच्छे, नावगे, वाघवडे, अनगोळ येथील औद्योगिक कामगारांचा भार आहे. औद्योगिक क्षेत्रासह त्यावर आधारलेल्या उद्योगातील कामगारही या क्लिनिकवर अवलंबून आहेत. यासाठी कामगारांच्या पगारातून निर्धारीत रक्कम कापली जाते. कामगारांकडून ज्या प्रमाणात महसूल जमा होतो त्या प्रकारे कोणत्या सुविधा ईएसआयकडून पुरविल्या जात नसल्याची तक्रार कामगार करीत आहेत.
उद्यमबाग येथील कोणत्याही कारखान्यामध्ये अपघात घडल्यास त्यांना एकतर अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटल अन्यथा खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागत आहे. कामगारांकडून पैसे घेऊन देखील त्यांना वैद्यकिय सेवा वेळेवर मिळत नाहीत. सध्या उद्यमबाग येथे असणाऱया क्लिनिकमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केला जात आहे. यामुळे कामगारांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातच मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी होत आहे.
उपचारासाठी दिवस वाया
कोणताही उपचार घ्यायचा असेल तर कारखान्यामधुन एक दिवसाची सुट्टी दिली जाते. परंतु उद्यमबाग येथून बसने चन्नम्मा सर्कल पर्यंत, तेथून नेहरूनगरपर्यंत दुसरी बस तर नेहरू नगर येथून रिक्षाने अशोकनगर पोहोचावे लागत आहे. यामध्येच दीड ते दोन तासाचा कालावधी जात आहे. त्यामुळे एका दिवसात उपचार घेणे शक्मय नसल्याने रूग्णाला पुन्हा दुसऱया दिवशी बोलाविले जाते. त्यामुळे दुसऱया दिवशीही सुट्टी काढण्याची वेळ कामगारांवर येत आहे. यापेक्षा जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे कामगारांना सोयीचे ठरत आहे.
गरज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलची
बेळगाव शहरात अशोकनगर येथे ईएसआयचे मुख्य हॉस्पिटल आहे. तर उद्यमबाग, अनगोळ, गोवावेस, चन्नम्मा सर्कल, यमनापूर रोड या ठिकाणी ईएसआय क्लिनिक आहेत. कोणतेही मोठे उपचार करायचे असतील तर रूग्णांना अशोकनगर येथे पाठविले जाते. तेथेही तज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची वाणवा आहे. त्यामुळे उद्यमबाग परिसरात मल्टि स्पेशालिटी इएसआय हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे.









