मुंबई / ऑनलाईन टीम
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीत्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आलो असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. यासोबतच यावेळी उदयनराजे भोसले यांना अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी आपल्याला या प्रकरणातील काहीही माहित नसल्याचे सांगत यावर प्रतिक्रिया देणो योग्य ठरणार नसल्याचे म्हटले.
यापूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनी देखील शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या शरद पवार यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
Previous Articleकराडमध्ये व्यापाऱ्यांचा मिनी लॉकडाऊनला विरोध
Next Article मंगळूर : चर्चमध्ये दरोडा, तपास सुरू








