वार्ताहर / उदगाव
कृषी कायद्याच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला उदगाव परिसरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले उद्योगधंदे बंद ठेवून प्रतिसाद दिला.
सकाळपासून दुपारपर्यंत व्यवहार बंद होते. नेहमीच आंदोलनामध्ये अग्रेसर ठरलेला येथील टोल नाक्यावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र बंद असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येत होती.