वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ई-कॉमर्स क्षेत्रासाठी गेला उत्सवी काळ अत्यंत लाभदायक ठरला आहे. त्यांच्या उत्पादनांना उत्सवी काळामध्ये 56 टक्के इतकी अधिक मागणी नोंदली गेली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत मागणी वाढीव दिसली आहे. युनीकॉमर्सने यासंबंधीची माहिती नुकतीच जाहीर केली आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याचे काम युनिकॉमर्स प्रामुख्याने करत असते.
दिवाळीपूर्वी 30 दिवस आधी विविध ई-कॉमर्स कंपन्यांनी 4.40 कोटी ऑर्डर्स प्राप्त केल्या होत्या. मागच्या वर्षाच्या ऑर्डरच्या तुलनेमध्ये मागणीत 56 टक्के वाढ दिसली आहे. ऑर्डर वृद्धीसोबत एकूण खरेदी मूल्यही 50 टक्के वाढले आहे.
आधीच्या तुलनेत ग्राहक ई-कॉमर्स कंपन्यांची उत्पादने खरेदी करताना या खेपेस अधिक सजग राहिले होते. नव्या श्रेणीतील उत्पादनांना ग्राहकांनी चांगली पसंती होती.