उत्रे / वार्ताहर
उत्रे ता.पन्हाळा येथील दरा नावाच्या शिवारात ग्रामस्थांना गव्यांचा खळप निदर्शनास आला. या परिसरात गव्यांनी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उत्रेचे सरपंच अभिजीत पाटील यांनी गव्यांचा वावर असल्याचे वनविभागाला कळविले आहे.
डोंगर भागातील हिरवा चारा संपुष्टात आल्याने निकमवाडी व धबधबधबेवाडी येथील झाडी व डोंगर उतारावरून रात्रीच्या वेळी गव्यांचा कळप उत्रेच्या शिवारात चाऱ्याच्या शोधात येत आहे. ऊस, मका व भाजीपाला आदी पिकांचे गव्यांने नुकसान केले आहे. शिवारात गव्यांचा वावर असल्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. महावितरणने कृषी पपांना दिवसा वीज पुरवठा करावा तसेच वनविभागाने या परिसरात पाहणी करून गव्यांचा बंदोबस्त करावा. गव्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.