प्रतिनिधी / मडगाव
गृह आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी महिलांच्या रांगा अलीकडे मडगाव पालिकेत पहायला मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने उत्पन्नाचे दाखले द्यावेत या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या रांगा वाढल्याचे पालिकेच्या अधिकाऱयांनी सांगितले. उत्पन्नाच्या बाबत आजपर्यंत तालुका मामलेदारांनी जारी केलेले दाखले व?ापरले जायचे. मात्र आता पालिकेकडून ते पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी अधिक रांगा लागण्याची शक्मयता असल्याने या आव्हानाला सामोरे जाताना पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. सरकारने गृह आधार योजनेसाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे या रांगा वाढण्याची शक्मयता असून सर्वांना वेळेत दाखले मिळतील याची दखल घ्यावी असा निर्देश कर्मचारी वर्गाला दिला असल्याची माहिती मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली.
आपण आधीच अधिकाऱयांना आणि कर्मचाऱयांना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. उत्पन्नाचे दाखले जारी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास दुसरा काऊंटर उघडला जाईल, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. गृह आधार योजनेसाठी जोडायचे उत्पन्नाचे दाखले गेल्या अनेक वर्षांपासून तालुका मामलेदारांनी जारी केलेले आहेत. सरकारने स्थानिक स्वराज संस्थांवर ही जबाबदारी सोपविली नव्हती याकडे पालिकेच्या एका अधिकाऱयाने लक्ष वेधले.
मामलेदार कार्यालयातून पालिकेवर उत्पन्नाचे दाखले देण्याची जबाबदारी अंतिम क्षणाला टाकली गेली असून पालिकेला मुदतीत दाखले पुरविणे शक्मय होत नसल्याने गृह आधारासाठी उत्पन्नाचे दाखले सादर करण्यासाठीची 31 ऑक्टोबर ही मुदत रद्द करून सरकारने त्यात वाढ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक रामदास हजारे यांनी केली आहे.









