ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तर मुंबईतील उपनगरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पुन्हा एकदा संपूर्ण लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात अवघ्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या कांदिवलीमध्ये 2090, मालाडमध्ये 3378३, बोरिवलीमध्ये 1825, तर दहिसरमध्ये 1274 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात रुग्ण दुपटीचा काळ वेगाने वाढला आहे. कांदिवलीत 25 दिवस, मालाडमध्ये 19 दिवस, बोरिवलीत 18 दिवस, तर दहिसरमध्ये 15 दिवस आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे कांदिवली ते दहिसर दरम्यान 115 परिसर प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. रुग्ण सापडल्याने 908 पैकी काही इमारती संपूर्ण, तर काही अंशत: सील करण्यात आल्या आहेत









