तब्बल १० तास घेतली बैठक
ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेशामध्ये सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर विरोधी पक्षांनी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रणनीती आखली आहे. आता तर भाजपला सत्तेत आणण्यासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात तरले आहेत. अमित शाह यांनी दिल्लीमधील पक्षाच्या कार्यालयात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून भाजपाने पुन्हा एकदा आपलं सरकार आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष जाहीर सभा वा कार्यक्रम घेण्याऐवजी आभासी प्रचार करावा असा आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. १५ जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो, चौक सभा घेण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. यामुळे राजकीय पक्षांवर मर्यादा आल्या असल्या तरी भाजपाने आधीच मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचं उद्धाटन करत मतदारांना गाठलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात नुकतीच अमित शाह यांनी कोअर कमिटीची तब्बल १० तास बैठक घेतली.









