- पहिली ते पाचवीच्या शाळा 1 मार्चपासून
ऑनलाईन टीम / लखनऊ :
प्रदेशात इयत्ता सहावी ते आठवीच्या शाळा 10 फेब्रुवारी तर इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळा 1 मार्च पासून सुरू होणार आहेत. बेसिक शिक्षण डायरेक्टरने उत्तर प्रदेशातील शाळा सुरू करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.

यानुसार, एका दिवशी शाळेत केवळ 50 % विद्यार्थी येण्यास परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही दिवशी 50% पेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही. वेगवेगळ्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी उपस्थित राहायचे आहे तो दिवस ठरवण्यात आला आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यास शाळा प्रशासनास तात्काळ जवळच्या रुग्णालयास सूचना देणे आवश्यक असणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विद्यार्थी घरूनच अभ्यास करणार असतील तर यासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे.
शिक्षक निर्देशक डॉ. सवेंद्र विक्रम बहादुर सिंह यांनी सांगितले की, जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे सर्व सरकारी आणि खासगी शाळांना पालन करणे सक्तीचे आहे.









