ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात निवडणुकीची रंगात वाढलेली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान २० राजी होणार आहे. त्या आधी एक धक्कदायक घटना घडली आहे. कुशीनगर जिल्ह्यात विहिरीत पडून ११ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुशीनगर जिल्ह्यात लग्नाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या महिलांना विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागला. तर १५ महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे. यावर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याप्रकरणी शोक व्यक्त करण्यात आला आहे.
नेबुओ नौरंगिया येथे अनेक महिला आणि तरुणी हळदीसाठी उपस्थित होत्या. हळदीचा कार्यक्रम सुरु असताना या सर्व महिला एका विहिरीवर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीवर उभ्या होत्या. जास्त वजन न झेपल्याने ही जाळी तुटली आणि त्यावर उभ्या सर्व महिला खाली विहिरीत पडल्या. यामध्ये ११ महिलांचा मृत्यू झाला तर १५ महिलांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.









