ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. प्रदेशातील मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. तर दोन मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. त्यातच आता पंचायती राज मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

स्वतः भूपेंद्र सिंह यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसून आल्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली होती. त्यात माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे.
मागील काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतः ला आयसोलेट करुन घ्यावे तसेच आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.









