नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवी दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत आता उत्सुकता लागली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये तासभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांच्या निवास्थानी गेले होते. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर योगी आदित्यनाथ भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे.
जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा स्थितीत राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.









