50 लाख मोबदल्यापर्यंत खटले हाताळणार
प्रतिनिधी / पणजी
उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी व्यावसायिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून त्यासंबंधीची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. 50 लाखांच्या मोबदल्यापर्यंतचे खटले या न्यायालयात हाताळले जाणार आहेत. कायदा खात्याचे अवर सचिव अमीर परब यांनी जारी केलेल्या अधिसूनेप्रमाणे पणजी जिल्हा न्यायालय क्र (1) व म्हापसा जिल्हा न्यायालय क्र (1) तसेच दक्षिण गोव्यासाठी मडगाव जिल्हा न्यायालय क्र (1) व जिल्हा न्यायालय क्र (2) व्यावसायिक न्यायालये म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
या जिल्हा न्यायालयाव्यतिरिक्त कनिष्ठ न्यायालयामध्ये वरिष्ठ दिवाणी ए न्यायालय पणजी, वरिष्ठ दिवाणी ए न्यायालय म्हापसा, वरिष्ठ दिवाणी ए न्यायालय डिचोली, वरिष्ठ दिवाणी ए न्यायालय फोंडा उत्तर गोव्यासाठी तर वरिष्ठ दिवाणी न्यायालय मडगाव तसेच अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायालय वास्को, हंगामी वरिष्ठ दिवाणी न्यायालय केपे दक्षिण गोव्यासाठी व्यावसायिक न्यायालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे.









