तैपेयी / वृत्तसंस्था
तैवान देशाच्या उत्तर भागाला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे देशभरात अनेक इमारतींची हानी झाली. राजधानी तैपेयीतही या भूकंपाचा परिणाम जाणवला. तथापि, या घटनेत जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच मोठी हानीही झालेली नाही. या भूकंपाचे केंद्र भूमीखाली 28.7 किलोमीटरवर होते. भूकंपाची तीव्रता 6.2 रिष्टर इतकी होती. काही इमारतींची तावदाने या धक्क्यामुळे फुटली तर काही इमारतींना तडे गेले, अशी माहिती देण्यात आली आहे.









