आमदार जयेश साळगावकर यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोना बाधीत तीन रुग्ण असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी उत्तर गोव्यात तसेच दक्षिण गोव्यात अशी दोन कोवीड हॉस्पिटल सुरु करण्याचे गोमंतकीय जनतेला आश्वासन दिले होते. राज्यात कोरोना बाधीतांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून अद्याप उत्तर गोव्यात कोवीड हॉस्पिटल सुरु करण्यात आलेले नाही. सरकार जनतेच्या जीवाशी खेळ करीत आहे की काय आसा प्रश्न माजीमंत्री तथा साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. उत्तर गोव्यात त्वरीत कोवीड हॉस्पिटल सुरु करा अशी मागणी आमदार साळगावकर यांनी केली आहे.
शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जयेश साळगावकर बोलत होते. राज्यात सध्य स्थितीत 2282 ऍक्टीव रुग्ण आहेत तर 72 जणंचा मृत्यू झाला आहे. केव साळगाव मतदार संघातच 44 रुग्ण मिळालेले आहेत. दक्षिण गोव्यात 220 खाटींची सोय असलेले कोवीड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. त्या हॉस्पिटल मध्ये सध्या जागा उपलब्ध नाही. उत्तर गोव्यातील रुग्णांनाही दक्षिण गाव्यातील केवीड हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते मात्र त्यांची काय स्थिती होते याचा पत्ता कुणालाच नसतो. दक्षिण गोव्यात असलेल्या कोवीड हॉस्पिटलमध्ये अपूऱया साधन सुविधा असून रुग्णावर व्यवस्थित उपचार होत नसल्याचेही साळगावकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी 1000 खाटींचे उत्तर गोव्यात कोवीड हॉस्पिटल सुरु करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा प्रश्न आमदार साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. उत्तर गोव्यात केवळ कोवीड केंद्र सुरु करून त्यात सर्व रुग्णांना ठेवले जात आहे. कोवीड केंद्रात रुग्णांची संख्या वाढत असून त्या ठिकाणी काम करणाऱया आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांनाही धोका निर्माण झाला आहे. राज्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असताना सरकार त्यावर ठोस उपाय योजना करण्यास कमी पडत असल्याचा आरोपही आमदार साळगावकर यांनी केला आहे.
गर दिवसाला 200 ते 300 कोरोना बाधीत रुग्ण मिळत आहेत. उत्तर गोव्यातही रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहेत. मात्र अजूनही सरकार उत्तर गोव्यात कोवीड हॉस्पिटल का सुरु करीत नाही. असा प्रश्न साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. सरकारने सामान्य लोकांच्या जवाचा खेळ न करता त्वरीत उत्तर गोव्यात स्वतंत्र कोवीड हॉस्पिटल सुरु करावे अशी मागणी आमदार साळगावकर यांनी केली आहे.









