पेडणे / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात राष्ट्रीय महामार्ग 66 वरील गोवा राज्यातील महत्त्वाचा पत्रादेवी चेक नाका बेभरवशाचा ठरत असल्याबाबत तसेच येणाऱया-जाणाऱया वाहनांची व्यवस्थित तपासणी होत नाही आणि सुरक्षा व्यवस्था कोलमडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन या नाक्मयावर काय चालते याची पाहणी करण्यासाठी काल बुधवार दि. 27 रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱयांना महत्वाच्या सूचना केल्या. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला.
पत्रादेवी चेक नाक्मयावर बाहेरून येणाऱया वाहनांची व्यवस्थित तपासणी होत नसल्याचा संशय व्यक्त करणारे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी काल 27 रोजी पत्रादेवी चेक नाक्मयावार अचानक भेट दिली वा पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत गोवा मुख्यसचिव अशोक कुमार व संयुक्त मामलेदार प्रिया कामत उपस्थित होत्या.
या नाक्मयावर जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारी वाहने तासन तास रांगेत उभी असतात, मात्र चिरे, खडी, रेती वाहतूक करणारे मोठे ट्रक गोव्यात प्रवेश करतात, हा भेदभव का असा सवाल यापूर्वीच नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यासाठी खास तपासणीसाठी आणखी एक केंद्र उघडण्याची सूचना जिल्हाधिकाऱयानी केली. याचबरोबर या नाक्मयावर ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या जिल्हाधिकारी आर .मेनका यांनी जणून घेतल्या.
पेडणे तालुक्मयातील पत्रादेवी, नईबाग-पोरस्कडे, किरणपाणी हे तीन महत्त्वाचे नाके आहेत. त्यातील सातार्डा, किरणपाणी आरोंदा हे दोन नाके पूर्णपणे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद आहेत तर पत्रादेवी चेक नाका एकमेव सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन येणाऱया जाणाऱया वाहतुकीसाठी खुला आहे. या नाक्मयावर सर्व प्रकारची हजारो वाहने रात्री अपरात्री येतात. त्या सर्व वाहनांची तपासणी योग्य पद्धतीने होत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी काल बुधवारी पत्रादेवी येथे भेट देऊन पाहणी केली.









