दोन्ही क्षेपणास्त्रs जपाननजीक कोसळली
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाने बुधवारी 2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs समुद्रात डागली आहेत आणि याद्वारे या देशाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी केल्याचे मानले जात आहे. दोन्ही क्षेपणास्त्रs जपाननजीक एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनबाहेर ती कोसळली आहेत. चीनचे विदेशमंत्री दक्षिण कोरियाच्या दौऱयावर असताना उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले आहे.
एक आठवडय़ापेक्षा कमी कालावधीत उत्तर कोरियाने दुसऱयांदा क्षेपणास्त्र डागले आहे. समुद्रात कोसळण्यापूर्वी या क्षेपणास्त्रांनी 880 किलोमीटरचे अंतर कापले आहे. या क्षेपणास्त्र चाचणींचे विश्लेषण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा करत आहेत.
क्षेपणास्त्र डागण्याची वेळ चीन आणि जपानसाठी एकप्रकारचा संकेत होता असे जाणकारांचे मानणे आहे. चीन आणि उत्तर कोरिया तसे परस्परांचे घनिष्ठ मित्र आहेत, पण दोघांच्या संबंधात कित्येकदा तणावही निर्माण झाला आहे.









