बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये आलेल्या पुरामुळे उत्तर कर्नाटकातील सुमारे १२,७०० घरांचे नुकसान झाले असून उत्तर कर्नाटकातील ६.३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
महसूलमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या १२ तालुका आणि २४७ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. सध्याच्या पूरात १० मृत्यू आणि 12,700 घरांचे नुकसान झाले आहे. उत्तर कर्नाटकातील मान्सून हंगामात भीमा, कृष्णा आणि त्यांच्या उपनद्यांना पूर आल्यामुळे ६.३ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ऑगस्ट ते आत्तापर्यंत सर्व बाधित कुटुंबांना १२७.९३ कोटी रुपयांची तातडीची मदत दिली जात आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने आतापर्यंत २१,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला होता.









