बागलकोट/प्रतिनिधी
मुसळधार पाऊस आणि ओसंडून वाहणाऱ्या नद्या यामुळे उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूल, रस्ते आणि शेतात पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अलमट्टी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने रायचूर, उदगीर, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील काही भागात अधिकाऱ्यांनी पूरचा इशारा दिला आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद एम. यांनी बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला.
कृष्णा, मालप्रभा आणि घाटप्रभा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राने येत्या २४ तासात उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे तसेच कृष्णा नदी व त्यावरील उपनद्या ओसंडून वाहत असल्याने मुंबई-कर्नाटक प्रदेशात पूर आला आहे.









