ऑनलाईन टीम / पॅरिस :
उत्तर आफ्रिकेतील अल कायद्याचा प्रमुख अब्देलमलेक ड्रॉकडेलला ठार करण्यात फ्रान्सला यश आले आहे. फ्रान्सच्या सरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली याबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
मालीमध्ये सन 2013 पासून दहशतवाद्यांविरोधात फ्रान्सची लढाई सुरू आहे. ISIS विरोधात लढण्यासाठी मालीमध्ये फ्रान्सचे हजारो सैनिक तैनात आहेत. या कारवाईत फ्रान्सने एका मोठ्या दहशतवाद्यालाही ताब्यात घेतले आहे. अब्देलमलेक ड्रॉकडेल हा अलकायदा इस्लामिक मगरेबचा प्रमुख होता. उत्तर अमेरिकेतील दहशतवादी कारवायांच्या मोहीमा तो राबवत होता.
पार्ली म्हणाल्या, अब्देलमलेकचा मागील 7 वर्षांपासून फ्रान्स शोध घेत होते. तो स्थानिक दहशतवाद्यांना जमात नुसरत अल इस्लाम वल-मुसलमीन (जेएनआयएम) शी जोडत असे. ही एक अल कायदाची संलग्न संस्था आहे. माली व आसपासच्या देशांमध्ये हे दहशत पसरवत होते.
2 जून रोजी फ्रान्स सैन्याने स्थानिक सुरक्षा दलासह दहशतवादी अब्देलच्या गुप्त ठिकाणावर हल्ला केला. हे दहशतवादी उत्तर अल्जेरियाच्या पर्वतीय भागात लपून बसले होते. या कारवाईत अनेक दहशतवादीही ठार झाले होते.









