ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी खाजगी रुग्णालयात देखील केली जात आहे. त्यामुळे सरकारकडून खाजगी रुग्णालय आणि लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठीच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. आरोग्य सचिव अमित सिंह नेगी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी आणि सरकारी रुग्णालयांकडून खाजगी लॅबमध्ये पाठवण्यात येणाऱ्या नमुन्यांसाठी 2 हजार रुपये (जीएसटी सहित) आणि खाजगी लॅबकडून स्वतः नमुने घेऊन जाणाऱ्यांसाठी 2400 रुपये आकारले जाणार आहेत. आतापर्यंत खाजगी लॅबकडून नमुने घेण्यासाठी 4500 रुपये आकारले जात होते.
दरम्यान, सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तराखंडमध्ये सरकारकडून 104 दिवसांमध्ये केवळ 55 हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. प्रदेशात प्रति लखांमागे जवळपास 440 नमुन्यांची तपासणी होत आहे. ही टक्केवारी एकूण देशाच्या टक्केवारी पेक्षा जवळपास 17 टक्क्यांनी कमी आहे.