ऑनलाईन टीम / देहरादून :
महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशातून हवाई मार्गाने प्रदेशात येणाऱ्या प्रवाशांची जौलीग्रांट एअरपोर्टवर कोरोना तपासणी केली जाणार आहे.
यासोबतच देहरादून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने वाढवण्यासाठी अतिरिक्त मोबाईल टीम तैनात केली जाणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी आशिष कुमार श्रीवास्तव यांनी आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
डॉ. आशिष कुमार श्रीवास्तव यांनी यावेळी चिकित्सा अधीक्षक डोईवाला यांना आदेश दिले आहेत की, देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा नवा प्रकार वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जौलीग्रांट एअरपोर्टवर उतरणाऱ्या प्रवाशांची विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट मधील प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात यावी.









