- ॲक्टिव्ह रुग्णांनी ओलांडला 74 हजारांचा टप्पा
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात कोरोनामुळे 168 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 5 हजार 541 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्येने 74 हजारचा टप्पा पार केला आहे. तर काल 4,887 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 49 हजार 814 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 66 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 25, 497 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 21,021 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 1,857 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 591, नैनिताल 517, उधमसिंह नगर 717, टिहरी 271, चमोली 210, पिथोरागडमध्येे 103, पौडीमध्ये 335, बागेश्वर 96 आणि चंपावतमध्ये 228, अल्मोडा 87, रुद्रप्रयाग 158 आणि उत्तरकाशीमध्ये 371 रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत 74,480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 3896 ( 1.56 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.66 % इतके आहे. तर 416 झोन आहेत.









