ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात 1 नोव्हेंबरपासून इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या शाळा सुरू होणार आहेत. खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग भरवले जाणार आहेत. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला.
शाळांमध्ये कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. अन्य इयत्तांच्या संदर्भात नंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाकडून वेगळी नियमावली जाहीर केली जाणार आहे. तसेच या बैठकीत अन्य विषयांवर देखील निर्णय घेतले गेले.
बैठकीतील अन्य निर्णय :
- राज्यातील कर्मचाऱ्यांना सणानिमित्त भेट दिली जाणार आहे.
- 2004 च्या सर्किल रेटच्या आधारावर वर्ग 03 आणि 04 च्या जामीन मालकांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळणार.
- उद्योग विभागातील सेवा नियमावलीमध्ये संशोधन केले जाणार.
- आबकारी विभागात मदिरा विक्रीसाठी ट्रेक अँड ट्रेस प्रणाली सुरु केली जाणार
- प्रदेशातील 2 लाख 43 हजार ड्रायव्हर आणि ई रिक्षा चालकांना एक एक हजार रुपये दिले जाणार.









