ऑनलाईन टीम / हल्द्वानी :
उत्तराखंडातील भाजपचे प्रदेश चे अध्यक्ष बंशीधर भगत यांचा मुलगा विकास भगत यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास भगत यांना तीन दिवसांपासून ताप होता. शुक्रवारी त्यांना सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवले असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
विकास हे भाजयुमो मधील प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रतिनिधी देखील आहेत. तिवारी हॉस्पिटल मधील डॉ. जोशी यांनी सांगितले की, विकास भगत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पुढे डॉ. जोशी म्हणाले की, सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये सध्या 190 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 42 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 28 जण आयसोलेशनमध्ये आहेत.









