ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 58 वर पोहचली असून, अजूनही 146 बेपत्ता आहेत. तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाखालील बोगद्यातून आणखी दोन मृतदेह हाती आले आहेत. या बोगद्यातून आतापर्यंत 11 मृतदेह सापडले आहेत.
चमोलीतील जोशीमठ येथे 7 फेब्रुवारीला हिमकडा कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 206 जण बेपत्ता होते. त्यामधील बेपत्ता 146 जणांचा शोध घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एस भदौरिया यांनी सांगितले की, तपोवन बोगद्यातील ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातील मृतदेह पोस्टमॉर्टेमच्या ठिकाणी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जात आहेत. मृतदेह नातेवाईकांनी वेळेत न नेल्यास अशा मृतदेहांचा डीएनए जतन केला जात आहे.