ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात हिमकडा कोसळल्याने ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित जवळपास 150 हून अधिक जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती आले असून, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.
चमोलीमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर सुरू झालेला पाण्याचा प्रवाह नंदप्रयागपर्यंत पोहचला आहे. चमोली, देवप्रयाग, कर्णप्रयाग आणि श्रीनगरमध्ये लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
आयटीबीपीच्या दोन टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या तीन टीमला देहरादूनहून घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. आणखी तीन टीम्स सायंकाळपर्यंत हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने घटनास्थळी पोहचणार आहेत.