ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 429 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 56 हजार 070 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,428 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 429 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 17, बागेश्र्वर 09, चमोली 12, चंपावत 22, देहरादून 157, हरिद्वार 55, नैनिताल 42, पौरी गरवाल 22, पिथोरगड 24, रुद्र प्रयाग 12,तेहरी गरवाल 03, यू एस नगरमधील 40 आणि उत्तर काशीमधील 14 जणांचा समावेश आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.3%
दिलासादायक बाब म्हणजे काल 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 48,798 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.3 टक्के इतके आहे. तर सध्या 06 हजार 145 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.









