ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या आदेशावरून कोविड -19 शी संबंधित चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 11.25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये राजकीय मेडिकल कॉलेज हल्द्वानी, दून आणि श्रीनगरसाठी प्रत्येकी 3.75 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. याचा उपयोग कोविड -19 ची चाचणी क्षमता वाढवण्यासठी आवश्यक मशीन आणि उपकरणांची खरेदी करण्यासाठी केला जाईल.
कोविड -19 सुशीला तिवारी रुग्णालय हल्द्वानी लवकरच आता 76 व्हेंटिलेटर असणारे कुमाऊंमधील पाहिले सरकारी रुग्णालय होईल. केंद्राकडून या रुग्णालयात बुधवारी 25 नवे व्हेंटिलेटर आले आहेत.