ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 999 कोरोना रुग्ण आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ऊधमसिंह नगर आहे. सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऊधमसिंह नगरने नैनिताल, टिहरी आणि हरिद्वार जिल्ह्यांना मागे टाकले आहे.
ऊधमसिंह नगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 671 वर पोहोचली आहे. त्यातील 306 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील आठवड्यापासून ऊधमसिंहनगर मध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे.
अल्मोडामध्ये 204 रुग्ण पॉझिटिव्ह असून 200 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बागेश्वरमध्ये 95 रुग्ण पॉझिटिव्ह असून 92 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. चमोलीमध्ये 81रुग्ण असून आतापर्यंत 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर सध्या चंपावनमध्ये 74, चमोलीमध्ये 81, चंपावत 74, हरिद्वार 455, नैनीताल 648, टिहरी 447, पौडी 182, पिथौरागड 77, रुद्रप्रयाग 67 आणि उत्तरकाशीमध्ये 102 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.









