ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 928 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. या सोबतच कोरोना रुग्णांनी 45 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 45 हजार 332 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 7217 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 928 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 51, बागेश्र्वर 21, चमोली 65, चंपावत 30, देहरादून 203, हरिद्वार 87, नैनिताल 173, पौरी गरवाल 107, पिथोरगड 4, रुद्र प्रयाग 13,तेहरी गरवाल 33, यू एस नगरमधील 117 आणि उत्तर काशीमधील 24 जणांचा समावेश आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.21%
दिलासादायक बाब म्हणजे काल 1488 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 33,642 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.21 टक्के इतके आहे. तर सध्या 10 हजार 934 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.