ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 467 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 67,706 वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देहरादून जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच 151 रुग्ण आढळून आले. तर अल्मोडा मध्ये 16, बागेश्वर 3, चमेली 37, चंपावत 3, हरिद्वार 54, नैनीताल 37, पौंडी 54, पिथौरागड 20, प्रयागराज 32, टिहरी 12, ऊधमसिंह नगर 29 आणि उत्तरकाशीमधील 19 जणांचा समावेश आहे.
गुरुवारी 4 जणांचा मृत्यू झाला. तर 300 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 61 हजार 732 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत 4,307 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









