ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 77 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यासोबत दिलासादायक बाब म्हणजे एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही आहे. तर कालच्या दिवसात 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 27,420 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर प्रदेशात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 40 हजार 959 इतकी झाली आहे. यातील 3 लाख 26 हजार 147 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्य स्थितीत प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.66 % इतके आहे. तर सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली असून 1,506 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 7,338 (2.15 %) जणांचा मृत्यू झाला आहे.