ऑनलाईन टीम / पिथौरागड :
उत्तराखंडातील पिथौरागडमधील काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजून 38 मिनिटांनी हा भूकंप झाला. पिथौरागडमधील नाचनी, मुनस्यारी, मदनकोट आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.









