ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 361 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 06 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 91,281 इतकी आहे. सद्य स्थितीत 4,577 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 13,639 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 124 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 10, बागेश्वर 03, चमोली 1, चंपावत 17 हरिद्वार 32, नैनिताल 87, पौडी गडवाल 18, पिथौरागड 16, रुद्रप्रयाग 08, टिहरी 2, उधमसिंह नगर 26 आणि उत्तरकाशीमध्ये 17 नव्या रुग्णांची भर पडली.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1515 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 492 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 83,998 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.









