ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 1,419 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 51,481 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 5944 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 1,419 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 00, बागेश्र्वर 26, चमोली 48, चंपावत 30, देहरादून 472, हरिद्वार 164, नैनिताल 89, पौरी गरवाल 58, पिथोरगड 29, रुद्र प्रयाग 30,तेहरी गरवाल 196, यू एस नगरमधील 175 आणि उत्तर काशीमधील 102 जणांचा समावेश आहे.
दिलासादायक बाब म्हणजे काल 392 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 41,487 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.59 टक्के इतके आहे. तर सध्या 09 हजार 089 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.