ऑनलाईन टीम / देहरादून :
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, उत्तराखंडात आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. राजधानी देहरादून मध्ये पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीतून आलेल्या तपासणी अहवालात नव्या स्ट्रेनची लक्षणे रुग्णात दिसून आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या रुग्णास तीलू रौतेली येथील कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा सर्विलांस अधिकारी डॉ. राजीव दीक्षित यांनी
- गेल्या 24 तासात 154 नवे रुग्ण
मागील 24 तासात 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 03 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 94,324 इतकी आहे. सद्य स्थितीत 2510 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 8055 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 40 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 01, बागेश्वर 04, चमोली 3, चंपावत 03, हरिद्वार 37, नैनिताल 30, पौडी गडवाल 09, पिथौरागड 12, रुद्रप्रयाग 04, टिहरी 6, उधमसिंह नगर 15 आणि उत्तरकाशीमध्ये 2 नव्या रुग्णांची भर पडली.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1596 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 187 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 88,948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.









