ऑनलाईन टीम / देहरादून :
राष्ट्रीय हरित अधिकरणाच्या आदेशानंतर उत्तराखंडात फटाके वाजवण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांनुसार राज्यातील 6 शहरांमध्ये दिवाळीत केवळ ‘ग्रीन फटाके’ वाजवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी देखील कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. नवीन नियमावलीनुसार राज्याची राजधानी देहरादून, हरिद्वार, ऋषिकेश, रुद्रपुर, काशीपुर आणि हल्द्वानी शहरात केवळ ग्रीन फटाके लावता येणार आहेत. दिवाळी आणि गुरुपर्वच्या दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेत आणि छटपूजेच्या दिवशी सकाळी 6 ते 8 या काळात केवळ दोन तास फटाके उडवण्यास परवानगी दिली आहे.
यासोबत दिवाळीत आतषबाजीमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डने राजधानीत अतिरिक्त दोन मॉनिटरिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहेत.









