ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. प्रदेशात मागील 64 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात केवळ 446 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 3,34,024 वर पोहचली आहे.

तर कालच्या दिवशी 1580 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 06 हजार 239 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 20,503 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 121 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 26, हरिद्वारमध्ये 67, नैनिताल 25, उत्तरकाशीमध्ये 23, पौडीमध्ये 20, टिहरी 54, अल्मोडा 7, रुद्रप्रयाग 9, चमोली 23, चंपावत 4, पिथोरागडमध्येे 61 आणि बागेश्वर जिल्ह्यात 6 रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 6,699 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 16,125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.38 टक्के इतके आहे.
- प्रदेशात ब्लॅक फंगसचे एकूण 299 रुग्ण

एकीकडे प्रदेशात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे ब्लॅक फंगसचा धोका वाढताना दिसून येत आहे. मागील 24 तासात प्रदेशात 20 नवे रुग्ण आढळून आले तर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 299 वर पोहोचली आहे. यातील 47 जणांनी आपला जीव गमावला आहे आहे. 18 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.









