काँगेसच्या सरिता आर्या भाजपमध्ये, हरकसिंह रावत काँग्रेच्या वाटेवर
उत्तरप्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांचे पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. मंत्री हरक सिंह रावत हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सरिता आर्या यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात महिलांना कमी भागीदारी मिळाल्याने त्या नाराज होत्या. देहरादून येथे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सरिता यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले आहे.
याचदरम्यान उत्तराखंड काँग्रेसकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असुन यात आर्या यांनी पक्षातून 6 वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. आर्या यांच्या विधानांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे यात नमूद आहे.
आर्या यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना ‘लडकी हूं, लड सकती हूं’ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले होते. उत्तराखंड निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मिळवू न शकलेल्या तुम्ही आम्हाला कधी संधी मिळवून द्याल अशी विचारणा अनेक महिला नेत्यांनी माझ्याकडे केली होती असा दावा त्यांनी केला आहे.









