ऑनलाईन टीम / श्रीनगर :
उत्तराखंडमध्ये सोमवारी 40 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यामध्ये एक पौडी जिल्ह्यातील पाबौमधील एका मृत व्यक्तीचे नमूने देखील पॉझिटिव्ह आले आहेत. तर नैनिताल आणि हरिद्वार जिल्हात प्रत्येकी नऊ रुग्ण पॉझिटिव आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 357 वर पोहचली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हरिद्वारमध्ये नऊ नवे रुग्ण आढळले आहेत. यातील रुद्रप्रयाग मधील 6 प्रवासी मुंबईतून श्रमिक एक्सप्रेस ट्रेन मधून हरिद्वार येथे आले होते. या सर्वांना पिरान कलियारमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर अन्य तीन जणांमधील दोन जण हे लंढौरा आणि एक जण रुडकीमधील आहे.
दरम्यान, सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.