पुढील वषी उत्तर प्रदेशबरोबर उत्तराखंडमध्येदेखील विधानसभा निवडणुका आहेत. तेव्हा उत्तर प्रदेशात आपण परत सत्तेत येऊ अशी खात्री भाजप श्रेष्ठाना आहे. पण उत्तराखंडबाबत काहीच सांगता येत नाही.
राष्ट्रीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व उत्तुंग आहे. लोकप्रियतेत त्यांच्या जवळपासदेखील भाजप अथवा विरोधी पक्षातील एकही नेता फिरकू शकत नाही ही वस्तुस्थिती 2014 पासूनच्या विविध निवडणुकांनी दाखवून दिलेली आहे. मोदींचा चेहरा पुढे करून गल्ली ते दिल्ली राज्य करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. म्हणूनच काही महिन्यांपूर्वी हैद्राबादच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत साक्षात गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदारपणे प्रचार केला होता. वाजपेयी-अडवाणींच्या जमान्यात त्यांनी म्युनिसिपल स्तरावर कधी प्रचार केल्याचे ऐकिवात नाही. तात्पर्य काय तर मोदी-शहा यांच्या अधिपत्याखालील भाजप अतिशय आक्रमक झाला आहे आणि भाजपचा ठसा सर्वत्र पोचवायची त्यांना घाई झाली आहे. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे’ असेच जणू म्हणत त्यांचे दिग्विजयी अभियान सुरू असते. कोणत्या राज्यात हार झाली तरी त्याने खचून न जाता परत ते पुढील वाटचाल करत राहतात. ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास’ असे घोषवाक्मय असले तरी भाजपची विजय पताका ही ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे झळकत आहे हे वास्तव आहे. असे असेल तर भाजपने उत्तराखंडच्या नेतृत्वपदी नुकताच बदल का केला हा प्रश्न साहजिकच पडणार आहे. ज्या त्रिवेंद्रसिंग रावत यांना मुख्यमंत्रीपदी नारळ देऊन पायउतार व्हायला लावले ते महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे चेले. रावत चार वर्षात एवढे वादग्रस्त झाले की एकाच वेळेला पक्षातून, संघ परिवारातून तसेच साधुसंत समाजाकडून त्यांच्याविरुद्ध उठाव झाला. उत्तराखंडमधील हरिद्वारला कुंभमेळा भरत असून तिथे म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध न केल्याने साधुसंत त्यांच्याविरुद्ध भडकले असे सांगितले जाते. त्रिवेंद्रसिंग रावत यांनी भरपूर उत्पात केला म्हणून त्यांची हकालपट्टी झाली असे आता सांगण्यात येत असले तरी ते एक अर्धसत्य आहे. याला कारण ध्रुवीकरणाच्या राजकारणाने आणि मोदींच्या नेतृत्वाने सर्व राज्यामधील सत्तादेखील हस्तगत करता येत नाही याची जाणीव भाजप श्रे÷ाrंना हळूहळू होत आहे. त्याचाच परिणाम या नेतृत्व बदलात झाला आहे. पुढील वषी उत्तर प्रदेशबरोबर उत्तराखंडमध्ये देखील विधानसभा निवडणुका आहेत. तेव्हा उत्तर प्रदेशात आपण परत सत्तेत येऊ अशी खात्री भाजप श्रेष्ठाना आहे. पण उत्तराखंडबाबत काहीच सांगता येत नाही. वीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे विभाजन करून त्याच्या पर्वतीय प्रदेशाचा वेगळा उत्तराखंड बनवण्यात आला. तेव्हापासून दर पाच वर्षांनी तेथील सत्ता भाजप आणि काँग्रेसला आलटून पालटून मिळत आहे. आता सत्ता काबीज करण्याची वेळ काँग्रेसची आहे. त्यामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत हे आता परत सक्रिय झाले आहेत. पक्षश्रेष्ठांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अगोदरच घोषित करावा असा त्यांनी लकडा लावला आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये विविध राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या कार्यक्रम फारसा हाती घेतला गेला नव्हता. मोदी-शहा यांचे गृहराज्य गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल या 75 वर्षांच्या झाल्यावर अमित शहा यांनी डाव साधला होता व आपले खासमखास विजय रूपानी यांना त्यांच्या जागी नेमले होते.
गेल्या वषीच्या लोकसभा निवडणुकीनंतर एक वेगळेच चित्र दिसत आहे. विविध राज्यातील निवडणुकात भाजपचा ग्राफ हा खाली खाली जात आहे याची जाणीव मोदी-शहा आणि नवीन पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना झालेली दिसत आहे. शेतकरी आंदोलनाच्या उदेकाने एक नवीन झंझट भाजपच्या मागे लागले आहे. त्याचा त्रास त्या पक्षाला हरियाणा आणि पंजाबमध्ये भोगावा लागत आहे. पंजाबमध्ये पुढील वषी निवडणुका आहेत आणि काँग्रेसचे अमरिंदरसिंगच तिथे परत मुख्यमंत्री बनणार असे भाजपलाही दिसत आहे. अशावेळी उत्तराखंड आपल्याकडे ठेवता येईल काय याकरता भाजप कामाला लागला आहे. भाजपचे नवीन मुख्यमंत्री तिरथसिंग रावत हे शहा यांच्या जवळचे मानले जातात. उत्तराखंडचे एक विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांचे ते शिष्य होत. उत्तराखंडमध्ये गेल्या वीस वर्षात नऊ मुख्यमंत्री झाले त्यावरून तेथील राजकारण किती अवघड आणि नागमोडी आहे याचे दर्शन होते. काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी हे एकमेव मुख्यमंत्री तिथे पाच वर्ष टिकले होते. पण त्याला कारण काँग्रेसमधील त्यांचे असलेले स्थान हेच होते. सोनिया गांधी आणि त्यांचा परिवारदेखील तिवारींना दचकून असायचा. अखण्ड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले तिवारी हे घाग राजकारणी होते. जेव्हा त्यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनायचे आहे हे सोनियांना कळले तेव्हा त्यांनी तिवारींची त्यापदी सहर्ष नेमणूक केली. एवढेच नव्हे तर 5 वर्षे त्यांना कोणी त्रास देणार नाही अशी व्यवस्था केली. काँग्रेसच्या तत्कालीन विजयाचे शिल्पकार आणि तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष हरीश रावत यांचे त्यामुळे बारा वाजले याची सोनियानी पर्वा केली नाही. गांधी घराण्याला तिवारींकडून दिल्लीत धोका टाळायचा होता आणि त्याकरता कोणाचेही बारा वाजवण्याची त्यांची तयारी होती.
हरीश रावत एकप्रकारे आपल्यावर झालेल्या अन्यायांची श्रेष्ठाना आठवण करून देत आहेत. गमतीची गोष्ट अशी की या छोटेखानी उत्तराखंडमधूनच मोदी-शहा यांचे एक भावी स्पर्धक आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ हे मूळचे उत्तराखंडच्या पौरी गढवाल भागातील ‘अजय सिंग बिश्त’. त्यांनी भगवा धारण करून स्वतःला भाजपचा बिनीचा शिलेदार बनवले आहे, मग कोणाला ते आवडो अथवा ना आवडो. योगींनी आपण एक खणखणीत बंदा रुपया आहोत असे भासवून साऱयांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ‘काम दमदार, योगी सरकार’ लोकांना पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात कसे भासते त्यावर सत्ताधारी पक्षात पुढे काय घडणार ते अवलंबून आहे. योगी स्वतःला हनुमानभक्त समजतात आणि अयोध्येत भगवान रामाचा भव्य पुतळा बनवण्याची त्यांनी शपथ घेतली आहे.
सुनील गाताडे








